साहित्य :-
- मध्यम आकाराचे बीट 2 ,
- बटाटा छोटा 1,
- टमाटर 1 ,
- लिंबू 1 ,
- कलमी छोटा तुकडा ,
- लसणाच्या कळ्या दोन ,
- अद्रक 1/2 इंच ,
- कलमी छोटा तुकडा ,
- जिरे 1/2 टीस्पून ,
- जिरे पावडर 1/4 टीस्पून ,
- मिरेपूड 1/4 टीस्पून ,
- शुद्ध गाईचे तूप 1 टीस्पून
- तेजपान 1,
- सेंधा नमक / रॉक सॉल्ट चवीनुसार ,
- तुळशी ची पाने 4
- पाणी 5 कप ,
कृती :-
1) सर्वप्रथम बीट व बटाटा यांचे साल काढून घ्या . स्वच्छ धुऊन घ्या .
2) चिरलेला बीट , बटाटा , टमाटर , कलमी , तेजपान , अद्रक , लसुन कुकर मध्ये टाका , त्यामध्ये 5 कप पाणी घाला व कुकर बंद करून गॅस वर ठेवा आणि मंद आचेवर 4 शिट्टी होऊ द्या .
3) थंड झाले की मिक्सर मध्ये बारीक करा . चाळणी ने गाळून घ्या .
4) एक पातेले गॅसवर ठेवा त्यामध्ये तूप घाला .गरम झाले की त्यात जिरे टाका .
5) त्यानंतर त्यात मिक्सर मधले सर्व मिश्रण घाला हव असेल तर पाणी घालू शकता .
चवीपुरते मीठ घाला उकळी येऊ द्या .
6) एका वाटीमध्ये सूप काढा वरून लिंबू पिळा ,मिरेपूड , जिरे पावडर टाका .
तुळशी ची पाने टाका .तुळशीच्या पानांचा अप्रतिम सुगंध आणि खूप छान अशी चव येईल.
गरमागरम प्यायला घ्या . हे पौष्टिक असे बीट सूप वेट लॉस आणि वेट मॅनेजमेंट दोन्ही साठी खूप मदत करते.
बीटचे फायदे
रोजच्या आहारात बीटचा वापर केला तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. बीटमध्ये अनेक आरोग्यदायी गुण आहेत.
बीटमुळे महिलांना ऊर्जा मिळते. मासिक पाळी जर नियमित येत नसेल आणि यावेळी त्रास होत असेल तर बीट खाल्याने त्यापासून सूटका होते.
रक्त वाढवण्यात बीट फायदेशीर ठरतं. बीटमुळे दूध वाढतं.
बीटमुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
यामध्ये कॅलरीज खूप कमी असते.
बीटमुळे कफ होण्याची समस्या दूर होते . बीट श्वसननलिका श्वच्छ ठेवते.
बीट खाल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.
No comments:
Post a Comment