साहित्य :-
- भगर 2 स्पून
- मध्यम आकाराचे बीट 1
- मध्यम आकाराचे गाजर 1 ,
- बटाटा छोटा 1
- हिरवी मिरची 1 ,
- लिंबू 1 ,
- कलमी छोटा तुकडा ,
- जिरे 1/2 टीस्पून ,
- जिरे पावडर 1/4 टीस्पून ,
- मिरेपूड 1/4 टीस्पून ,
- सेंधा नमक / रॉक सॉल्ट चवीनुसार ,
- शुद्ध गाईचे तूप 1 टीस्पून आणि पाणी 4 कप ,
1) सर्वप्रथम बीट , गाजर , बटाटा यांचे साल काढून घ्या. स्वच्छ धुऊन घ्या .प्रत्येकी चार फोडी करा
2) भगर पण स्वच्छ धुऊन घ्या . चिरलेला बीट , गाजर , बटाटा , हिरवी मिरची , कलमी ,
भगर कुकर मध्ये टाका ,त्यामध्ये 4 कप पाणी घाला व कुकर बंद करून
गॅस वर ठेवा आणि चार शिट्टी होऊ द्या .
3) थंड झाले की मिक्सर मध्ये बारीक करा .
4) एक पातेले गॅसवर ठेवा त्यामध्ये तूप घाला .गरम झाले की त्यात जिरे टाका .
5) त्यानंतर त्यात मिक्सर मधले सर्व मिश्रण घाला . छान पैकी जर सूप थोडं पातळ
हव असेल तर थोडे पाणी घालू शकता किंवा थोडं घट्ट हव असेल तर तसेच
राहू द्या छान उकळी आली की गॅस बंद करा . चवीपुरते मीठ घाला
6) एका वाटीमध्ये सूप काढा वरून लिंबू पिळा , मिरेपूड , जिरे पावडर टाका .
खातांना थोडं कुरकुरीत वाटण्यासाठी तुम्ही भाजलेले शेंगदाणे वरून टाकू शकता .
उपवासासाठी अतिशय पौष्टिक आणि चवदार सूप तयार आहे .
तसेच साबुदाण्या पेक्षा अत्यंत पचनास सोपे आहे .
हे वेट लॉस आणि वेट मॅनेजमेंट दोन्ही साठी खूप मदत करते .
भगरीचे फायदे
- भगरीमध्ये प्रथिने चे प्रमाण भरपूर असते.
- तांदूळ, गहू, ज्वारी या धान्यापेक्षा भगरीत कॅलरी कमी असतात.
- कॅलरी कमी असल्यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी सुद्धा भगर उपयुक्त ठरते.
- जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे थोडीशी भगर खाऊन सुद्धा शरीरात शक्ती येते.
No comments:
Post a Comment