साहित्य :-
- अंकुरित मूग 1/2 कप,
- पालक चिरलेला 1 कप
- छोटा टमाटर 1,
- एक लिंबू 1 ,
- जीरा 1 टीस्पून ,
- हिंग 1 /4 टीस्पून ,
- लाल मिरची सुकी 1 ,
- लसणाच्या कळ्या दोन
- मोहरी 1/4 टीस्पून,
- मिरेपूड 1/4 टीस्पून ,
- तूप 1 टीस्पून आणि पाणी 3 कप ,
- सेंधा नमक / रॉक सॉल्ट चवीनुसार
कृती :-
1) सर्वप्रथम अंकुरित मूग स्वच्छ धुऊन घ्या आणि कुकर मध्ये टाका नंतर त्यात
स्वच्छ धुऊन चिरलेला टमाटर टाका त्यामध्ये 3 कप पाणी घाला
कुकर बंद करून गॅस वर ठेवा आणि चार शिट्टी होऊ द्या .
2) थंड झाले की मिक्सर मध्ये बारीक करा .
3) एक पातेले गॅसवर ठेवा त्यामध्ये तूप घाला .गरम झाले की त्यात जीरा , मोहरी , लाल मिरची ,
चिरलेला लसुन टाका नंतर त्यात हिंग घाला.
4) त्यानंतर त्यात सर्व मिश्रण घाला , चिरलेला पालक टाका. छान पैकी जर सूप थोडं पातळ हव
असेल तर थोडे पाणी घालू शकता किंवा थोडं घट्ट हव असेल तर तसेच राहू द्या छान
उकळी आली की गॅस बंद करा . चवीपुरते मीठ घाला
5) एका वाटीमध्ये सूप काढा वरून लिंबू पिळा , मिरेपूड टाका .
तुमचे अतिशय चवदार पौष्टिक सूप तयार आहे हे वेट लॉस आणि वेट मॅनेजमेंट दोन्ही साठी खूप मदत करत.
अंकुरित मुगाचे फायदे
- पचनास मदत होते
- वजन कमी करण्यास मदत करते
- प्रथिने समृद्ध स्रोत
- व्हिटॅमिन K
- व्हिटॅमिन C
पालकचे फायदे
- वजन कमी करण्यासाठी .
- डोळ्याच्या आरोग्यासाठी
- रक्तदाब कमी करण्यासाठी
- हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी
- रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी
- अशक्तपणाचा धोका कमी करण्यास
- पालकांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के आढळतात,
आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करू शकता
No comments:
Post a Comment