वजन कमी करणारे अतिशय पौष्टिक असे अंकुरित मुगाचे सूप
साहित्य :- अंकुरित मूग 1 कप
छोटा टमाटर 1,
छोटा गाजर 1
एक लिंबू 1
जीरा 1 टीस्पून
हिंग 1 /4 टीस्पून
मोहरी 1/2 टीस्पून
सेंधा नमक / रॉक सॉल्ट चवीनुसार
मिरेपूड 1/2 टीस्पून
तूप 1 टीस्पून
आणि पाणी 4 कप
कुती :-
1) सर्वप्रथम अंकुरित मूग स्वच्छ धुऊन घ्या आणि कुकर मध्ये टाका नंतर त्यात स्वच्छ धुऊन चिरलेला टमाटर व गाजर टाका त्यामध्ये चार कप पाणी घाला व कुकर बंद करून गॅस वर ठेवा आणि चार शिट्टी होऊ द्या .
2)कुकर थंड झाला की झाकण काढून घ्या व रई ने मिश्रण मस्तपैकी ढवळून घ्या एकजीव करा ,हव असेल तर मिक्सर पण वापरू शकता .
3) एक पतेला गॅसवर ठेवा त्यामध्ये तूप घाला .गरम झाले की त्यात जीरा ,मोहरी टाका नंतर त्यात हिंग घाला.
4)त्यानंतर त्यात सर्व मिश्रण घाला ,छान पैकी जर सूप थोडं पातळ हव असेल तर थोडे पाणी घालू शकता किंवा थोडं घट्ट हव असेल तर तसेच राहू द्या छान उकळी आली कि गॅस बंद करा .
5) एका बाऊलमध्ये सूप काढा त्यात लिंबू पिळा , वरून मिरेपूड टाका ,चवीनुसार मीठ घाला.
तुमचे अतिशय चवदार पौष्टिक असे अंकुरित मुगाचे सूप तयार आहे हे वेट लॉस आणि वेट मॅनेजमेंट दोन्ही साठी खूप मदत करत.
अंकुरित मुगाचे फायदे
1. पचनास मदत होते
2. वजन कमी करण्यास मदत करते
3. प्रथिने समृद्ध स्रोत
4. व्हिटॅमिन K चा चांगला स्रोत
5. व्हिटॅमिन C चा उत्कृष्ट स्त्रोत
6. रक्त परिसंचरण वाढवते
7. फोलेट आणि मॅग्नेशियम सारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजांचे उच्च स्त्रोत
No comments:
Post a Comment