साहित्य :-
- लाल मसूर 1/2 कप,
- टमाटर 2,
- छोटा गाजर 1,
- जीरा 1 टीस्पून ,
- छोटा कांदा 1,
- एक कलमी छोटी ,
- तेजपान 1,
- लसणाच्या कळ्या दोन
- मिरेपूड 1/2 टीस्पून ,
- सेंधा नमक / रॉक सॉल्ट चवीनुसार ,
- तूप 1 टीस्पून आणि पाणी 4 कप
कुती :-
सर्वप्रथम लाल मसूर स्वच्छ धुऊन घ्या आणि कुकर मध्ये टाका नंतर त्यात स्वच्छ धुऊन चिरलेला टमाटर
गाजर ,छोटा कांदा ,एक कलमी ,तेजपान टाका त्यामध्ये चार कप पाणी घाला व कुकर बंद करून गॅसवर
ठेवा आणि चार शिट्टी होऊ द्या .
थंड झाले की मिक्सर मध्ये बारीक करा .चाळणी ने गाळून घ्या .
एक पातेले गॅसवर ठेवा त्यामध्ये तूप घाला .गरम झाले की त्यात जीरा टाका चिरलेला लसुन टाका .त्यानंतर त्यात सर्व मिश्रण घाला ,छान पैकी जर सूप थोडं पातळ हव असेल तर थोडे पाणी घालू शकता किंवा थोडं घट्ट हव असेल तर तसेच राहू द्या छान उकळी आली कि गॅस बंद करा .चवीपुरते मीठ घाला
एका वाटीमध्ये सूप काढा वरून मिरेपूड टाका .
अतिशय चवदार पौष्टिक असे लाल मसूर सूप तयार आहे हे वेट लॉस आणि वेट मॅनेजमेंट दोन्ही साठी खूप मदत करत.
लाल मसूर डाळीचे फायदे
1. पचनास मदत होते
2. वजन कमी करण्यास मदत करते
3. प्रथिने समृद्ध स्रोत
4. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
5. दात आणि हाडांना मजबूत बनवते
No comments:
Post a Comment